उन्हाळी हंगामातील पिकांसाठी 15 एप्रिलपर्यंत पाणी अर्ज करावेत



उन्हाळी हंगामातील पिकांसाठी 15 एप्रिलपर्यंत पाणी अर्ज करावेत

जळगावदि.31(प्रतिनिधी) -  कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे  यांचे अधिपत्याखालील धुळेनंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पलघु प्रकल्पबंधारेअधिसूचित नदीनाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागाईतदारांना 1 मार्च ते 30 जुन, 2018 या कालावधीकरिता उन्हाळी हंगाम 2017-18 साठी भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकासाठी उपलब्धतेनुसार पाणी देण्यात येणार आहे.

त्यासाठी लाभ क्षेत्रातील इच्छूक शेतकऱ्यांनी पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल, 2018 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन  कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभागधुळे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने