घोडगाव येथील शेतमजुरांचा रहिवाशी प्लॉट प्रश्नी आंदोलनाचा एल्गार!*

 



*घोडगाव येथील शेतमजुरांचा रहिवाशी प्लॉट प्रश्नी  आंदोलनाचा एल्गार!*

 चोपडा दि.२८(प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी)

 तालुक्यातील घोडगाव येथील प्राथमिक शाळेच्या पूर्वेकडील गेल्या 40 वर्षांपासून वस्ती करून असलेल्या २५/३० शेतमजुरांना केंद्र सरकारच्या पीएम आवास योजना अंतर्गत घरकुले मंजूर झालेली आहेत. ते पात्र ठरवण्यात आले आहेत परंतु रहिवासी जागा नावावर नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेता येनार नाही म्हणून त्या परिसरातील शेतमजुरांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे असे लालबावटा शेतमजूर युनियन ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे

 याबाबत सविस्तर असे की,  युनियनचे नेते काम रेड अमृत महाजन यांच्या मार्गदर्शन प्लॉटमध्ये मीटिंग घेण्यात आली त्यावेळी या शेतमजुरांना त्यांच्या रहिवासी जागा नियमाकुल करून तेथे घरकुल बांधून द्यावीत अशी मागणी करण्यात आली. मिटिंगच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड विश्वास गोरख पाटील होते या शेतमजुरांना त्यांची पूर्वापार रहिवासी सोईची जागा नावे करून घरकुल बांधून द्यावेत यासाठी जळगाव जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयावर व इतर वरिष्ठ धिकार्‍यांकडे दाद मागण्याचे ही ठरवन्यात आले त्यावेळी उपसरपंच श्री जितेंद्र पाटील यांनीही आपले पाठिंबा दर्शक विचार मांडले. त्यानंतर या शेतमजुरांची  आज रोजी परत बैठक घेण्यात येऊन तीत खालील कार्यकारिणी गठित करण्यात आली

. त्या कार्यकारणीच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड विश्वास पाटील, उपाध्यक्ष बाळू कोळी ,सचिव इरफान मणियार ,खजिनदार समाधान कोळी ,सदस्य सर्व श्रीमती रेखा रमेश पाटील सिंधुबाई दगडू कोळी  सर्व श्री सुरेश रघुनाथ कोळी लक्ष्‍मण बाबुराव कोळी सुनील नर्सिंग बारेला, ईश्वर महादू कोळी भीमा रुपचंद अशी  कार्यकारिणी निवडण्यात आली..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने