*पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन......*
चोपडादि.२८ (प्रतिनिधी) :---
चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात येते. दि. २५ व २६ रोजी शाळेच्या प्रांगणात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी पाहून तसेच इतर क्षेत्रात त्यांची धाडसी कामगिरी पाहता भविष्यात त्यांनी चांगली कामगिरी करून नावलौकिक मिळवावे, यश संपादन करावे. यासाठी प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक विविध गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे तथा रोटरी क्लब ऑफ चोपडा चे अध्यक्ष पंकज बोरोले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले; तसेच महाराष्ट्र शासनातर्फे नुकताच जळगाव येथे डायट संस्थेमार्फत अमराठी शाळांचे प्रशिक्षण घेण्यात आले.त्यात मराठी शिक्षिका शुभांगी पाटील व मराठी शिक्षक धनंजय सोनवणे यांनी विशेष सहभाग घेतला व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल अध्यक्षांच्या हस्ते या वेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी
विशेष उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे पंकज प्राथमिकचे मुख्याध्यापक एम .व्ही .पाटील, पंकज माध्यमिकचे मुख्याध्यापक व्ही .आर .पाटील, पंकज कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव वाघमोडे तसेच पंकज ग्लोबल चे प्राचार्य मिलिंद पाटील ,पंकज इंग्लिश मीडियम चे प्राचार्य संदीप वन्नेरे, गंगाधर पाटील , सागर ओटारी, के .एन. महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करावे व प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात यावे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नावलौकिक करण्यासाठी माझे शिक्षक नियमित प्रयत्न करत असतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सनेर, युक्ति अग्रवाल, खुशी माळी, रुचिका चौधरी, स्वरा पाटील
या विद्यार्थीनींनी केले.
सदरील कार्यक्रमातील गौरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वस्तीगृह प्रमुख के .पी .पाटील, समन्वयक किरण चौधरी, के.के शुक्ला ,चंद्रकांत पाटील, उपमा जैस्वाल, स्वाती पाटील, मुकेश पाटील, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले....