आदिवासी कोळी समाजाचा शहादा येथे महा मेळावा…

 आदिवासी कोळी समाजाचा शहादा येथे महा मेळावा… 


मनवेल ता.यावल/जळगाव (प्रतिनीधी )आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभाग नंदुरबार जिल्हाच्या वतीने दि.२७/०२/२०२२ रविवार रोजी आदिवासी नगरी शहादा जि. नंदुरबार न्यु. प्रकाशा रोड मनिष पेट्रोल पंपासमोर मिरा नगर शहादा येथे आदिवासी लोक नेते माजी कॅबिनेट मंत्री तथा आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी कोळी समाजाचा महा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा महा मेळावा डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होत असुन आदिवासी कोळी महासंघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष भाऊराव बागुल साहेब ( Retd. Sr. PI ) यांनी आयोजन व नियोजन केले आहे.आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या नेतृत्वात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे आदिवासी कोळी महासंघ राज्य समन्वयक प्रशांत तराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच


आमदार मा. राजेश पाडवी शहादा- तळोदा मतदार संघ आ.लताताई चंद्रकांत सोनवणे चोपडा विधानसभा मतदारसंघ माजी आ.मा. चंद्रकांत अण्णा सोनवणे चोपडा मतदार संघ भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार प्रभाकर अप्पा सोनवणे राज्य कार्यकारिणी सदस्य जळगाव जि. परिषद गट नेते दिपक बापू पाटील चेअरमन सह. साखर कारखाना पु.नगर प्रा.मोतीलालजी पाटील नगराध्यक्ष शहादा नगरपालिका


प्रा.मकरंद भाई पाटील गटप्रमुख शहादा नगरपालिका नारायण दादा बागुल जेष्ठ समाजसेवक नामदेव जी येळवे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धुळे ईश्वर बागुल सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश कोळी डॉ. तेजस्विनी कोळी नंदुरबार संभाजी बोरसे साहेब (Retd. Dysp) कविता ताई कोळी सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच प्रल्हाद सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊराव बागुल नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा.मोतीलाल जी सोनवणे सल्लागार, मार्गदर्शक नंदुरबार भैयासाहेब जाधव धुळे ,नितीन भाऊ कांडेलकर जळगाव जिल्हाध्यक्ष ,सुभाष सपकाळे जळगाव जिल्हाध्यक्ष,विनोद जाधव कर्मचारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,संजय कांडेलकर जळगाव जिल्हा मार्गदर्शक भुषण भाऊ ठाकरे अध्यक्ष धुळे जिल्हाध्यक्ष , ब्रिजलाल शिरसाठ सचिव नंदुरबार , अशोक भाऊ शिरसाठ उपाध्यक्ष नंदुरबार ,मंगल भाऊ कांडेलकर राज्य प्रवक्ते ,सुनिता ताई कोळी जळगाव महिला जिल्हाध्यक्षा जगन्नाथ बापू बाविस्कर जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख , शंभू अण्णा शिवरे ,विश्वनाथ भाऊ कोळी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ,मनोहर कोळी जिल्हा मार्गदर्शक ,जगदीश भाऊ सोनवणे जळगाव कर्मचारी जिल्हाध्यक्ष, दिपक भाऊ सोनवणे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात आदिवासी कोळी जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात असुन देश स्वातंत्र झाल्यानंतर भारतीय घटनेने आदिवासी कोळी जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा देवून टोकरे कोळी, कोळी ढोर, महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी,या अत्यंत मागास अस्पृश्य जमातींना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून त्यांना कायदेशीर संविधानिक अधिकारी प्राप्त करून देण्यात आले आहे पण आजपर्यंत या जमातींना त्यांचे अधिकार मिळाले नाही काही लोक प्रतिनिधींच्या वर्चस्वामुळे या भागातील अत्यंत गरीब अशा जमाती दयनीय जीवन जगत आहेत त्यांचे मुलभूत अधिकार हिरावले गेले आहे भारतीय घटनेचे आर्टिकल १४,१६,२१ याचे सतत उल्लंघन होत आहे या जमातींना जातीचे दाखले मिळत नाही मिळालाच तर त्याची पळताळणी होत नाही या मुळे त्यांना शासकीय अधिकार व योजने पासून वंचित राहावे लागत आहे म्हणूनच झोपेचे सोंग घेणा-या शासनाला, पुढा-यांना , शासकीय अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी जमातींना त्यांचे आरक्षण हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी शहादा येथे महा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या महा मेळाव्याला नंदुरबार जिल्हा,जळगाव जिल्हा धुळे जिल्ह्यातील सर्व अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाजाचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने