*चोपडा येथे समस्त हिंदुत्ववादी संघटना,शिवप्रेमी,आदींची शासनाकडे विविध मागणींचे निवेदन सादर..

 



*चोपडा येथे समस्त हिंदुत्ववादी संघटना,शिवप्रेमी,आदींची शासनाकडे विविध  मागणींचे निवेदन सादर..

======================


चोपडा दि.२३(प्रतिनिधी) कर्नाटक राज्यातील हिजाब विरोधात आंदोलन करणाऱ्या बजरंग दलाचे 26 वर्षीय क्रार्यकर्ते (श्री हर्षा) यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तसेच त्या मागील देशद्रोही शक्तीना अटक करून तात्काळ शासन व्हावे,या न्याय मागणीसाठी आज चोपडा तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना,शिवप्रेमी संघटना कडून दि.23 फेब्रुविरी 2022,बुधवार रोजी,दु.12:00 वाजता चोपडा तहसिलदार श्री.अनिल गावित साहेब यांच्या माध्यमातून केंद्रिय गृहमंत्री श्री.अमित शाह यांना प्रमुख पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले,

*कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील बजरंग दलाचा युवा कार्यकर्ता स्व.हर्षा याची देशविघातक शक्तीकडून निरघुन हत्या केली, मागील काही दिवसांपासून देशविघातक शक्तीकडुन जाणीवपूर्वक हिजाब चे आंदोलन उभारून कायदा व सु-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे तरी अश्या जिहादी विचारधारेचे लोकांकडून चाकुने भोसकुन क्रुर पणे (हर्षा)यांची हत्या करण्यात आली या घटनेमुळे सर्व देशात हळहळ व्यक्त होत आहे,म्हणून आज चोपडा तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्वपक्षीय  राजकीय पदाधिकारी,कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी  उपस्थित होते,

या निवेदनाद्वारे या देशात ज्या ज्या हिंदु कार्यकर्त्यांना ,हिदु नेत्यांना अश्या धमक्या देण्यात आल्या आहेत,त्यांना योग्य संरक्षण देण्यात यावे,काही दिवसापूर्वीच मुकर्रम खान या काॅग्रेसच्या नेत्याने 'हिजाबला विरोध करणार्‍यांचे तुकडे तुकडे करुन टाकू' असे विधान केले होते,त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,या आंदोलनाच्या आडून महाराष्ट्र राज्यातही कायदा सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या ज्या देशविघातक शक्ती आहेत,त्यांच्यावर कठोर कारवाई  करण्यात यावीअशा विविध मागण्या करण्यात आल्या.

यावेळी रा.स्व.संघ विभागचालक श्री.राजेश पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,मनसे मा.जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे,सामाजिक कार्यकर्ते दिलिप नेवे,हिंदुजनजागरण समिती यशवंत चौधरी,्सरचिटणीस हनुमंतराव महाजन,डाॅ.मनोहर बडगुजर,सहकार आघाडी अध्यक्ष हिंमतराव पाटील,मनसे मा.जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे,युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, प्रखंड मंत्रीबजरंग दल पवन चित्रकथी,रा.स्वसंघ तालुका कार्यवाह मनोज विसावे,जिल्हायुवा मोर्चा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,किसानमोर्चा अध्यक्ष भुषण महाजन,भाजपाता.चिटणीस भरत सोनगिरे,सनातन संस्था सुधाकर चौधरी,अनिल पाटील,शिवसेना पदाधिकारी प्रविण जैन,मनसे विद्यार्थीआघाडी निलेश बारी,शहर सचिव महेंद्र भामरे,युवामोर्चा विवेक गुर्जर,रा.स्व.संघ शुभम नेवे,रा.स्व.संघ गौरव अग्रवाल,अजय भोई,अर्जुन चौधरी,जितेंद्र बारी,मोल भाट,सुधाकर महाजन,गोपाल पाटील,सुनिल पाटील,हरेश्वर पाटील,सुधाकर चौधरी,आदि पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी या घटनेचा तिव्र शब्दात जाहिर निषेध करुन,निवेदन देवून शासनाकडे मागणी केली..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने