श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम..
चोपडा दि.२४(प्रतिनिधी) बी फार्मसी महाविद्यालयाचा विद्यापीठाच्या परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला असून तृतीय वर्ष बी.फार्मसीत कु.महाजन स्वाती अरुण व पाटील व कु. उत्कर्षा मनोहर पाटील (CGPA score ९.२३) प्रथम क्रमांक, कु.याज्ञीक योगिता विश्वनाथ, महाजन सुनीता शांताराम व कासार चैतन्य योगेश (CGPA score ९.०८) अनुक्रमे द्वितीय क्रमांक,कु.अहिरराव योगेश्वरी शामकांत व खर्चाने आकाश बालू (CGPA score ९.००) तृतीय क्रमांक तसेच चतुर्थ वर्ष बी. फार्मसीत कु.पाटील दिव्या दिनेश, पाटील जानव्ही विजय व झाडे मंजूषा सतीश (CGPA score ९.५०) प्रथम क्रमांक, कु.लोहार योगेश्वरी देवराम (CGPA score ९.४२) द्वितीय क्रमांक,चौधरी अक्षय गोटू, डाके संदीप नानासाहेब व पाटील रुपेश संभाजी (CGPA score ९.३३) तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा काल संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैय्यासाहेब.अॅड.संदीपभैय्या सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनच्या यशाचे कौतुक करून येणाऱ्या काळात औषधनिर्मितीच्या क्षेत्रात भारत अग्रेसर होणार असून या क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य असून या संधीचे सोनं करण्याचे आवाहन केले तसेच आपले कौशल्य विकसित करून भविष्यात मोठं यश संपादित करा अश्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ वडनेरे यांनी महाविद्यालय हे विध्यार्थ्यांनच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्रित असून त्याच अनुषंगाने या वर्षी एनबीए च्या पुनर्मुल्याकनाच्या तिसऱ्या फेरी साठी प्रयत्नशील असून त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांनच्या प्रगतीला होत असतो असे सांगितले .महाविद्यालयात कार्यरत प्रा डॉ संदीप रमेशराव पवार यांची क.बै.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येते फार्मासुटीक्स या विषयाच्या अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी तसेच प्रा.सौ.क्रांती पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभागाच्या करियर कट्टा या उपक्रमात जिल्हा समन्वयक पदी नेमणुक करण्यात आली त्यांचा सुध्दा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सचिव माननीय ताईसाहेब डॉ.स्मिताताई संदीप पाटील,समन्वयक नानासो दिलीप साळुंखे,प्राचार्य.डॉ. गौतम प्रकाश वडनेरे व सर्व प्राध्यापक, प्रबंधक, उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले