सातपुड्यात वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

   


सातपुड्यात वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी



वर्डी,ता.चोपडा दि.२४(प्रतिनिधी डाॕ. रवि शिरसाठ):    शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला अंतर्गत सातपुडा पर्वतात हजारो वृक्षांची ची लागवड करण्यात आली मात्र काही भ्रष्ट वन कर्मचाऱ्यांमुळे वृक्षतोडीस प्रधान्य देऊन सातपुडा उजाड करण्याचं पाप करत आहेत. सातपुड्यातील गट क्रमांक 197/198 मध्ये 40  हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर वृक्षतोड करून नवाड जमीन तयार करू तुरीचे पीक घेण्यात आले आहे  त्या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकावे तसेच वन अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केलेले होते त्या रोपांची नासधूस करण्यात आली ती कोणाच्या कृपेने तसेच काही वन अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आदिवासींकडून आर्थिक व्यवहार करून जंगल तोडीस संमंती दिलेली आहे त्या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन सहाय्यक वनरक्षक श्री हडपे साहेब यांना देताना  शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, सचिन डाभे, राजेंद्र पाटील, विनोद धनगर, विवेक गुजर, रविंद्र पाटील , सुकलाल धनगर, राजेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने