चोपडा आगारात राजभाषा गौरव दिन साजरा
चोपडा दि.२७ (प्रतिनिधी ) - येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात कविवर्य (कुसुमाग्रज)वि वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन मराठी राजभाषा गौरव दिन डाॅ प्रा के एन सोनवणे( उपप्राचार्य ए एस सी महाविद्यालय चोपडा) यांच्या अध्यक्षेतेखाली साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व तुकाराम महाराज गाथा, ज्ञानेश्वरीचे पुजन करुन कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच आगार प्रमुख संदेश क्षीरसागर, स्थानक प्रमुख चंद्रकांत चौधरी, स का अ अनिल बाविस्कर यांनी प्रवाश्यांचे गुलाब पुष्प व पेढे देवुन सत्कार करुन शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रास्ताविक प्रभाकर महाजन यांनी केले.यावेळी.डि डी.चावरे , कुंदन बोरसे,विजय सोनवणे, जयश्री परदेशी सह कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.