राशी वृक्ष संकल्पना नावीन्य पूर्ण उपक्रम- आमदार किशोर पाटील
भडगाव दि.- पर्यावरण संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकासाठी काळजी गरज आहे,गावांच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यायला पाहिजे,शिवरायनी निसर्ग पायदळी तुडवत शत्रूंना नामोहरम केले. यासाठी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे या विचाराने ओमकार विहार कॉलनीच्या ओपन स्पेसचा उपयोग राशी च्या नावाने करून देशी वृक्षांची लागवड केली याबद्दल तुमचे अभिनंदन "असे विचार आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते फणस, आवळा या वृक्षांची लागवड करन्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी श्री रविंद्र लांडे हे होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.प्रमोद पाटील, मनोहर चौधरी,अरुण पाटील,तुषार भोसले,भूषण थेपडे, ॲड.शिसोदे,गणेश परदेशी,नागेश वाघ,किरण पाटील,संदीप पाटील सौ.शिल्पा पाटील,सरला कोळी,पल्लवी शिरसाठ, ज्योती पाटील, रोहिणी पाटील, गायत्री पाटील, जयश्री येवले,श्रद्धा जैस्वाल,ज्योती पाटील मनीषा पाटील,कल्पना येवले, डॉ. प्रणिता पाटील,शुभांगी भोसले, निकिता शिरसाठ, पूनम भोसले,नितीन पाटील, छोटू वैद्य व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले