वेळोदे गावी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त व मराठी राज्यभाषा दिनानिमित्त"मी मावळा शिवबाचा" या विषयावर दणदणीत जाहीर व्याख्यान संपन्न

 


वेळोदे गावी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त व मराठी राज्यभाषा दिनानिमित्त"मी मावळा शिवबाचा" या विषयावर दणदणीत जाहीर व्याख्यान संपन्न

गलंगी  ता.चोपडा दि.२७( प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी):    आज दिनांक 27/2/2022 रोजी वेळोदे तालुका चोपडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त व मराठी राज्यभाषा दिनानिमित्त संध्याकाळी ठीक 7.30 वाजता प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय प्रबोधनकार प्राध्यापक गणेश पाटील सर नंदुरबार यांचे मी मावळा शिवबाचा या विषयावर दणदणीत जाहीर व्याख्यान झाले त्या वेळी अध्यक्ष म्हणून भाजपचे ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष मोतीलाल सोनवणे हे होते त्या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार योगेन्‍द्र चौधरी यांनी केला व अध्यक्ष यांच्या सत्कार अनिकेत सोनवणे यांनी केला तसेच शिवजयंतीच्या दिवशी जिल्हा परिषद शाळा वेळोदे येथे वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती त्यावेळी वकृत्व स्पर्धेत भाग घेतलेली विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र वही पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर व गावातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक श्री आनंदराव बाबुराव बोरसे व के आर सोनवणे सर तसेच शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका व गावातील तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ यांची अनमोल सहकार्य मिळाले तसेच राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते श्री सतीश करनकाळै यांनी स्वाक्षरी मोहीम राबविली त्यावेळी सूत्रसंचालन प्रवीण पाटील सर व दीपक चौधरी सर यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने