अधिकारी सेनेतर्फे मराठी दिन साजरा

  


अधिकारी सेनेतर्फे मराठी दिन साजरा

नाशिक दि.२७( प्रतिनिधी दिलीप पाटील)आज दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी ज्येष्ट साहित्यिक डॉक्टर भास्कर म्हरसाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. सौं. स्मिता कुलथे नासिक जिल्हा उपाध्यक्ष यांनी डॉक्टरांचा परिचय व प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉक्टर म्हरसाळे यांनी उपस्तितांना मार्गदर्शन केले. मराठी मायबोलीच्या कविता ऐकवल्या आणि मराठी भाषेबद्दल सविस्तर वर्णन करून मराठी भाषा किती गोड आणि सुंदर आहे हे समजावून सांगितले.

!! माझ्या मराठीचा लावा लळाटी तिला, तिच्या जागरणाने जागतील दरी खोऱ्यातील शिळा!!

याप्रसंगी सौं. रंजना निकाले, सौं. भारती वर्मा, सौं. चैताली झेंडे, कु. सुरभी, सौं. सुप्रिया, कु. स्नेहल, सौं. अरुणा पगारे उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौं. भारती वर्मा राणेनगर प्रभाग अध्यक्षा यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने