*आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ*
यावल दि.२७(प्रतिनिधी) आज दि.27 फेब्रुवारी 2022 रविवार रोजी संपूर्ण देशात पल्स पोलीओ अभियान रबविण्यात येत आहे तालुका वैद्यकीय आधिकारी मा.मनीषा महाजन व प्रा.आ.केंद्र सावखेडासिम मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद येथे टीम च्या माध्यमातून 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकाना पोलीओ डोस पाजन्यात आला येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सरपंच श्री मा. सरपंच याकुब तडवी यांचे हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपसरपंच शशिकांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल पाटील,श्री.विठ्ठल सूर्यवंशी,श्री.फत्तू तडवी आदि उपस्थित होते.
एकही बालक पोलीओ डोस पासुन वंचित राहणार नाही यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांच्या तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या यशस्वीते साठी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील, सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी, आरोग्य सहाय्यक श्री.एल.जी.तडवी, आरोग्य साह्ययिक श्रीमती शोभा चौधरी, आरोग्यसेविका श्रीमती.मेहमूद तडवी ,आरोग्यसेवक भुषण पाटील, आशासेविका छाया वाघुळदे ,उषा कोळी ,सरला गुंजाळ, अंगणवाडी सेविका जयश्री राणे, टोपलाबाई मोरे,अंगणवाडी मदतनीस रुपाली कोळी सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन केले.