*चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भव्यदिव्य रोषणाई अन् ढोल ताशांच्या निनादात लेझीमच्या ठेक्यावर ऐतिहासिक पोवाड्याच्या दणाणाऱ्या आवाजात जल्लोषात साजरी*

 



*चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भव्यदिव्य रोषणाई अन् ढोल ताशांच्या निनादात लेझीमच्या ठेक्यावर ऐतिहासिक पोवाड्याच्या दणाणाऱ्या आवाजात जल्लोषात साजरी*

चोपडा (प्रतिनिधी): -
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, नगराध्यक्षा सौ मनीषा जीवन चौधरी, नगर पालिका गटनेते जीवनभाऊ चौधरी, नगरसेविका सौ सुप्रिया सनेर, आशिषभाई गुजराथी, घनश्याम अग्रवाल, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, काँग्रेस आय माजी जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, माजी आमदार कैलास बापू पाटील, अमृतराव सचदेव , भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, नगरसेवक महेश पवार , नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेविका सौ संध्या महाजन, जि प सदस्या प्रा. नीलिमा पाटील, प्रवीण जैन, यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी माल्यार्पण करून छत्रपतींना अभिवादन केले
शिव जयंती निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात महात्मा गांधी शिक्षण मंडळ विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक, महात्मा गांधी चौक मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ व राजमाता जिजाऊ मित्र मंडळ यांनी आकर्षक व सुंदर लेझीम नृत्य सादर केले. दरम्यान दिनेश बाविस्कर, राजेंद्र पाटील, भटू पाटील यांनी लेझीम पथकामध्ये ठेका धरला तसेच गायक पंकज पाटील व प्रीती पाटील यांनी शिवगीते व पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अश्वनृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. बालमोहन विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मल्लखांब द्वारे विविध प्रात्यक्षिके सादर केली तसेच विविध नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज

सातारा येथील विशाल राजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, चोपडा शहरातील सर्व नेते एकत्र येऊन मतभेद विसरून सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती साजरी करीत आहात हि बाब उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. विराट जनसमुदाय व शिवप्रेमी पाहून ते भारावले. ३९३ वर्षापूर्वी जन्माला आलेल्या युगपुरुषाची जादू आजही कायम आहे. छत्रपतीची तेरावी पिढी आव्हान करीत आहे की, छत्रपतींच्या विचार घरोघरी पोचवायचा आहे. छत्रपती शेतकरी राजा होते. परस्त्रीला मातेसमान माननारा राजा होते. त्यांनी स्वराज्य निर्माण केले.

सदर कार्यक्रमादरम्यान रुबाब मराठी युट्युब चॅनेल चे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. कार्यक्रमासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यात पोलीस उपविभागीय अधिकारी भास्कर डेरे, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण, एपीआय अजित साळवे, घनश्याम तांबे यांनी मोठा व चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने