*अत्याचारी नराधमास फाशीची* *शिक्षा द्या मागणीसाठी**तेली समाजाचे जिल्हाभर आंदोलन.*

 



*अत्याचारी  नराधमास  फाशीची* *शिक्षा द्या मागणीसाठी**तेली समाजाचे जिल्हाभर आंदोलन.*

  *चोपडा दि.२२(प्रतिनिधी)*  -धरणगाव येथे   दोन बालिकांवर चंदुलाल मराठे नामक नराधमाने अत्याचार केले असून अशा  नराधमास फाशीच्या शिक्शेची मागणी करण्यासाठी प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्ह्यातर्फे  तीव्र धिक्कार व निषेध आंदोलन करण्यात येणार आहे .दिनांक 23फेब्रुवारी2022 रोजी प्रत्येक तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता आंदोलन करून मा. तहसीलदार साहेब यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.  जिल्ह्याच्या ठिकाणी मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभर आंदोलन होईल असे प्रसिद्धीपत्रक प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तजी क्षीरसागर, प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, युवक महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत  येसी, जळगाव जिल्हा अध्यक्ष के डी चौधरी, महिला अध्यक्षा सौ निर्मलाताई चौधरी, शासकीय सेवा  महासंघ प्रदेशाध्यक्ष भागवतराव चौधरी, विभागीय अध्यक्ष नगरसेवक श्री राजेंद्र चौधरी, विभागीय युवक अध्यक्ष सदानंद चौधरी, विभागीय युवक कार्याध्यक्ष प्रशांत सुरडकर, जळगाव जिल्हा कायदे विषयक महासंघ जिल्हाध्यक्ष एडवोकेट वसंतराव भोलाने, युवक जिल्हाध्यक्ष एडवोकेट सुरज चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी, महासचिव दत्तात्रय चौधरी, सर्व तालुकाध्यक्ष व समस्त समाज बांधवांनी या घटनेचा धिक्कार करून तीव्र शब्दात निषेध केला आहे.  23 फेब्रुवारीच्या आंदोलनात समस्त समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष व समस्त पदाधिकारी यांनी केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने