वढोदे जि. प. प्राथमिक शाळेत शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा संपन्न




वढोदे जि. प. प्राथमिक शाळेत शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा संपन्न

    चोपडा दि.२५(प्रतिनिधी मच्छिंद्र रायसिंग):  १९ फेब्रुवारी २०२२ रोजी वेळोदे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. जि. प. प्राथमिक शाळा, वेळोदे येथे सकाळी ९:०० वाजता शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यात १ली ते ५वी या लहान गटातून  मयुरी सुनिल सोनवणे प्रथम, निरंजन नीलेश माळे द्वितीय, जान्हवी पंढरीनाथ बाविस्कर तृतीय तर हेमांगी भिकन पाटिल हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. तसेच ६वी ते १२वी या मोठ्या गटातून हेमांगी संदीप जैन प्रथम, हर्षदिव्या सुनिल सोनवणे द्वितीय, उमाकांत अनिल शिरसाठ तृतीय तर प्रणाली प्रवीन पाटील हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. या वकृत्व स्पर्धेसाठी वेळोदे येथील भारतीय सैन्यात असलेल्या जवानांनी बक्षीस दिले. या पश्चात सकाळी ११:०० वाजता छत्रपति शिवाजी महाराज चौकात भारतीय सैनिकांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करून सर्व शिवभक्त तरुण व ग्रामस्थांनी शिववंदना केली. सायंकाळी ४:०० वाजता शिव पूजन करून पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात गावातील शिवभक्त तरुणी, तरुण तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संपूर्ण वेळोदे गाव शिवमय भगव्या पताक्यांनी व ध्वजांनी सजून गेलेले होते. रात्रि ८:०० वाजता शिववंदना करून या पालखी सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमात तरुण मित्र मंडळ,वेळोदे व ग्रामस्थ तसेच गुरुदत्त टेंट हाउस, वेळोदे यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने