होतेड येथे महिला कीर्तन सप्ताहाचा दोन मार्च ला समारोप गणपूर(ता चोपडा)ता 25: हातेड बुद्रुक(ता चोपडा)येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला 23 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून यावेळी होणाऱ्या महिला कीर्तन सप्ताहाची दोन मार्चला काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता होणार आहे.
दररोज पहाटे प्रभात फेरी,काकडा आरती व सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन सेवा होत असून एक मार्चला पालखी व दिंडी सोहळा होणार आहे. आणि 2 मार्चला विश्वासराव भदाणे व वाल्मिक भदाणे यांचे कडून महाप्रसादाचे वाटप होईल.माऊली भजनी मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.