शिंदखेडा - खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळ शिंदखेडा तालुका आयोजित खानदेश वारकरी मेळावा संपन्न..
शिंदखेडा दि. १७(प्रतिनिधी) :
आशापुरी माता मंदिर पाटण तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. सुदामजी महाजन तहसीलदार मा. रजनीताई वानखेडे शिंदखेडा नगरअधक्ष मा. रमेशचंद्र टाटीया ज्येष्ठ उद्योगपती तथा संस्था महाविर पतसंस्था खलाने मा. हेमंत साळुंखे शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीण प्रमुख मा.आप्पासो लखन शेठ रुपनर उद्योगपती तथा चेअरमन माध्यमिक विद्यालय बाभळे तालुका शिंदखेडा ह.भ.प. जगताप प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. बच्छाव खंडू अण्णा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग माळी जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. खेमराज पवार तालुका अध्यक्ष ह.भ.प. राजेंद्र वाघ जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. राजेंद्र पवार तालुका सचिव ह.भ.प. विशाल माळी तालुका युवा अध्यक्ष ह.भ.प. योगेश बागुल तालुका सचिव हे प्रमुख अतिथी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प. अनिल जगताप सर यांनी केले होते. यावेळी जीवनगौरव पुरस्कार मानकरी ह.भ.प. हरिभाऊ ठाकरे तबलावादक खलाने ह.भ.प. खेमराज पवार दराने राजेंद्र पवार यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या वेळी ज्येष्ठ नागरी यांना मानधन मिळावे असे ह.भ. प. अनिल जगताप सर यांनी अतिथी समोर मत मांडले सुदाम जी महाजन तहसीलदार यांनी वारकऱ्यांना आश्वासन दिले की खान्देश शाहीर ज्येष्ठ कलावंतांना मानधन मिळत नसेल त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असे सुधामजी महाजन तहसीलदार बोलले त्यानंतर हेमंत साळुंखे शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीण प्रमुख यांनीदेखील वारकऱ्यांचे पाठपुरावा यांना हातभार लावू व त्यांना मदत करू असे हेमंत साळुंके साहेब आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ ठाकरे यांनी केले व आभार प्रदर्शन विशाल माळी यांनी केले.