*प्रा.एन.डी.पाटील यांचे निधनाने कष्टकऱ्यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा भक्कम आधार निखळला*.... !!


 


*प्रा.एन.डी.पाटील यांचे निधनाने कष्टकऱ्यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा भक्कम आधार निखळला*....  !!

      एन. डी. चे जाणे जरी अटळ व अपरिहार्य असले तरी, त्यामुळे राज्यातील कष्टकरी व परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आधारवड गेला असे म्हणावे लागेल.....


     १९९० नंतर देशात व राज्यात जागतिकीकरणामुळे , शेतकरी व कष्टकर्यासमोर निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचा मुकाबला करण्यासाठी एन डी नेहमीच अग्रभागी राहीले , त्यात एन्रॉन  विद्युत प्रकल्प , रायगड व राज्यातील सेझ विरोधी लढा, शेतकर्यांची विजबिलाचे माध्यमातून होणारी लूट, " कसेल त्याची जमीन " यासाठी भूमिहीनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे असो, नविन शैक्षणिक धोरणामुळे बहुजनांना शिक्षण बंदी वा आडमार्गाने येणारी चातुर्यवर्ण्य व्यवस्था असो, वा सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न असोत........ अशा असंख्य ..आघाड्यांवर ते सतत लढत राहीले........

      स्वातंत्र्य लढ्याबरोबरच, गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, एनरॉन व सेझ विरोधी लढाई त अग्रभागी राहिलेच, तसेच समाजाला बुरसटलेल्या विचारापासून परावृत्त करण्याचे हेतूने ते शेवटपर्यंत  अंधश्रध्दा विरोधी चळवळीमध्ये कार्यरत राहीले.....

    जागतिकीकरण विरोधी कृती समिती चे वतीने आयोजित सेझ ( SEZ) विरोधी परिषदेसाठी, प्रा. एन. डी. पाटील हे भाई वैद्य व अन्य नेत्यांसह औरंगाबाद ला शेवटचे जानेवारी २००७ मधे आले होते, त्याची ही आठवण आज प्रकर्षाने होते आहे......

..... म्हणूनच तळागळातील कार्यकर्त्यांचे सुख दुःखात नेहमीच धाऊन जाणाऱ्या  एन.डी ना , महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, जय किसान आंदोलन - स्वराज अभियान चे वतीने भावपूर्ण आदरांजली...!!

... साथी सुभाष लोमटे ( सरचिटणीस) , महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ/ जय किसान आंदोलन

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने