चोपडा तहसिल कार्यालयातील स्वातंत्र्य सैनिकांच्या नाम फलकावर गुटख्याची पिचकारी.. बलिदानाची आहुती देणाऱ्या वीरांची कुठली चाललीय मस्करी.. ताबडतोब फलकाची दुरुस्ती व्हावी मागणी


 





चोपडा तहसिल कार्यालयातील स्वातंत्र्य सैनिकांच्या नाम फलकावर  गुटख्याची पिचकारी.. बलिदानाची आहुती देणाऱ्या वीरांची कुठली चाललीय मस्करी.. ताबडतोब फलकाची दुरुस्ती व्हावी  मागणी

चोपडा दि.२२(प्रतिनिधी) : भारत देशाच्या स्वतंत्र्य लढ्यासाठी प्राणाची आहोती देणाऱ्या स्वतंत्र्य सैनिक हा देशासाठी एक अभिमान असुन पण मुळात मात्र चोपडा तहसील कार्यालय जवळ लावण्यात आलेले फलक हे नाममात्र स्वरूपात अतिशय अस्वच्छ दिसुन आले आहे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपले स्वतंत्र्य सैनिक यांनी इतिहासात जी आहोती दिली व आज आपल्याला वर्तमान व भविष्यात, स्वतंत्र्यात राहण्याची संधी दिली अश्या कतृत्वान,महानव्यक्तीचा आपल्या विसर पडला की काय?आज आपल्या आपले अभिमान कतृत्वान व्यक्तीची नावे असलेला फलक आज नाममात्र का? कोणी वाली आहे की नाही ह्या फलकास टिकवण्यास? जो स्वतंत्र्य सैनिक देशासाठी आपल्या प्राणाची आहोती देत देश सेवा करतो त्याच सैनिकाच्या फलकावर विमल,गाय छाप,बार खावून थुकत आहेत. हीच काय आपली संस्कृती,देशभक्ती देशसेवा? अद्याप कोणत्याही अधिकारी या गोष्टीकडे लक्ष देत नसुन या स्वतंत्र्य सैनिकाच्या फलकांमध्ये माझे वडीलांचे नाव अनुक्रमाक (१४०)अभिमन यशो पाटील (धानोरा) हे असून व इतर स्वतंत्र्य सैनिकांची नावे देखील पुसट स्वरूपात आहे हे मोतीलाल पाटील यांच्या लक्षात आले की जो व्यक्ती आपल्या जिवाची व कुटुंबाचा कोणताही विचार न करता देशसेवा बजावतो... तरी देखील स्वतंत्र्य सैनिकाच्या फलकांची विटंबना व चोपडेकरासाठी फार नामुस्कीची बाब आहे तरी चोपडा तहसीलदारांनी स्वतंत्र्य सैनिकाच्या फलकाकडे लक्ष देऊन येत्या २६ जानेवारी पर्यंत नविन स्वतंत्र्यसैनिकाची नामेनिशी फलक आकर्षक दिसण्या योग्य लावण्यात यावे अशी प्रतिक्रिया मोतीलाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने