*तापीनदीत कच्चा रस्ता तयार झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण..*जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.


 





*तापीनदीत कच्चा रस्ता तयार झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण..*जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.

*चोपडादि.२२ (प्रतिनिधी)* तालुक्यातील खेडीभोकरी व भोकर दरम्यान तापी नदीत दरवर्षी १ जानेवारीपासून हंगामी लाकडी पूल वापरण्यासाठी सुरू करण्यात  येत असतो.परंतु या ठिकाणी कायम पक्का पूल मंजुर झाल्याने ह्यावर्षी हंगामी लाकडी पूल बनवण्यात येणार नव्हता.या मार्गाने जातांना लहान मोठ्या वाहनधारक चालक व पादचारी यांना नदीतील पाण्यातून जाताना खूपच त्रास सहन करावा लागत होता.यासाठी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी याठिकाणी त्वरित हंगामी लाकडी पूल बनविण्यात यावा अन्यथा तापी नदीपात्रात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्याच्या  बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या होत्या.

        याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी वेळीच दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तापी नदीत पाईप टाकून माती व रेतीचा कच्चा रस्ता त्वरित बनविण्यात यावा अशा कडक सूचना दिलेल्या होत्या.त्यानुसार खेडीभोकरी व भोकर दरम्यान तापीनदीतून वापरासाठी कच्चा रस्ता तयार झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थं व ह्या मार्गाने जाणार्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.यासाठी सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.

---------------------------------------------

*कच्च्या रस्त्यावर अवजड* 

*वाहनांचा अपघात होऊ शकतो..*

तापी नदीत बनविण्यात आलेल्या मातीरेतीच्या तात्पुरत्या रस्त्यावरून अवजड वाहने वापरतांना कच्चा रस्ता खचुन जाऊ शकतो.यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.नविन पक्का पुल बांधकामास बरिच वर्षे लागु शकतात.तोपर्यंत दरवर्षी याठिकाणी हंगामी लाकडी पुल बनविण्यात यावा...

                     *जगन्नाथ बाविस्कर,*

माजी संचालक..मार्केट कमेटी,चोपडा.

----------------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने