*१४ धारदार तलवारींसह ४जणांना अटक,१आरोपी पसार होण्यात यशस्वी*

 









*१४ धारदार तलवारींसह ४जणांना अटक,१आरोपी पसार होण्यात यशस्वी*

चोपडा दि.०३(प्रतिनिधी)चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक  राकेश पाटील यांनी तालुक्यातील सत्रासेन गावापासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या चेक पोस्टजवळ मारोती व्हॅन वाहन क्रमांक एम एच १९ सीएफ ४५७१ हे वाहन राजस्थान पुष्कर येथून चौदा तलवारी घेऊन येत असल्याची गुप्त माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीसांनी
दुपारी चार वाजेच्या सुमारास सापळा रचून आरोपींसह तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस नाईक राकेश
पाटीलने संबधित मारूती सुजूकी ओमनी  गाडीला थांबवून अधिक तपासणी केली असता. यात १४ तलवारी मिळून आल्या तसेच या गाडीत पाच इसम होते तर यातून एक आरोपी मुशरीफ खान रा. भडगाव हा लघुशंकेच्या नावाने  थोड्या अंतरावर जाऊन पसार होण्यात यशस्वी झाला.

सविस्तर असे की, सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या सत्रासेन येथे फॉरेस्ट चेक पोस्टवर ओमनी MH१९ –सि फ ४५७१ नंबरच्या गाडीतून चौदा तलवारी सापडल्या त्या गाडीची चौकशी करत असताना किमान पाच आरोपी होते त्यातून एक आरोपी हा फरार झाला.आरोपीकडून तलवारीची किंमत ९८ हजार ओमनीची किंमत २ लाख रुपये, चार मोबाईलची किंमत. -५० हजार रुपये असे एकूण ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात १)मुस्ताकीन
खान रा. आस्थानगर, चाळीसगाव, २) आरिफ इब्राहिम
पिंजारी, घाटरोड, चाळीसगाव, ३)मेहबूब खान, हरीम खान जमिल खान, घाटरोड, चाळीसगाव, ४) सलमान खान अय्यूब खान इस्लामपुरा,
चाळीसगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे
पुढील चौकशी डीवायएसपी ऋषीकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीसनिरीक्षक देविदास कुनगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हे. कॉ. शिंगाणे करत आहे रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदचे काम सुरू होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने