भाषण करतांना जयसिंग वाघ सोबत प्रा बि एन चौधरी , प्रभारी नगराध्यक्ष निलेश चौधरी , माळी महासंघाचे अध्यक्ष विठोबा माळी
*धरणगाव शिवसेने तर्फे क्रांतीज्योती सावित्री आईंना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..ज्ञानमंदिरी हे ज्ञान अज्ञ गोरगरीबांना वाटणे म्हणजे सुंदर जगाची निर्मिती..जेष्ठ विचारवंत तथा लेखक जयसिंग वाघ*
धरणगाव दि.०३ (प्रतिनिधी सुनील सोनवणे):- धरणगाव नगरपरिषदेच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
प्रसंगी जेष्ठ विचारवंत व लेखक मा.जयसिंगराव वाघ, प्रसिद्ध कवी लेखक समीक्षक तथा व्यंगचित्रकार मा.प्रा.बी.एन.चौधरी, शिवसेना सह संपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.निलेश भाऊ चौधरी,उप नगराध्यक्षा सौ. कल्पना विलास महाजन व माळी समाजाचे अध्यक्ष मा.विठोबा नामदेव महाजन उपस्थित होते.
सर्व प्रथम प्रास्ताविकेत *मा.गुलाबरावजी वाघ* यांनी माईंनी केलेल्या कार्याचा आढावा देत सांगितले की... *माईंनी स्वयंस्फुर्तीने समाजसेवेचे व्रत स्विकारले होते.यासाठीच सावित्रीबाईं शेवटचा श्वास घेतला तोसुद्धा प्लेगच्या पेशंटची सेवा करतानाच.*
*शिक्षणाने स्त्रीच्या जीवनात असे प्रगतीचे दीपक उजळवले की अंधारजाळे दूर झाले. जगाच्या विस्तिर्ण आकाशात आज भारतीय महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रांत मानाने उंचच उंच ठरतोय तो त्यांच्याच योगदानाने.*
*अश्या ह्या 'क्रांतीज्योती' सावित्रीबाईं फुलेंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.*
*सर्वश्रेष्ठ दान आहे ते ज्ञानाचे. हे असे दान की ते दिल्याने आपलेच ज्ञान वाढते हेच खरे सत्य आहे.* असे सांगून या प्रसंगी आपली भावना व्यक्त केली.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे *जेष्ठ विचारवंत तथा लेखक मा. जयसिंगराव वाघ* यांनी आपले विचार व्यक्त करीत सांगितले की...
*_रूप तियेचे करी विच्छिन्न_*
*_नकोसे केले तिजला त्याने_*
*_शोषून काढी मध तियेचा_*
*_चिपाड केले तिला तयाने_*
*....सावित्रीबाई फुले.*
*हा आहे पुरुषी मानसिकतेवरचा प्रहार. तो सुद्धा त्या काळात म्हणजे चक्क सन १८४८ मध्ये केलेला. 'चुल आणि मुल' हेच जीवन झालेल्या स्त्रीला स्वातंत्र्याची जाण करुन देत त्यांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करुन ते प्राप्त करुन देणाऱ्या 'क्रांतीज्योती' सावित्रीबाई फुलेंनी हा इतिहास घडविलाय.*
*शिक्षणापासून वंचित ठेवून स्त्रियांचे प्रगतीचे पंख कापणाऱ्या तत्कालीन समाजात त्यांनी सर्व जातीधर्मासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. पूढे लवकरच मुलींच्या शिक्षणाच्या पाच शाळाही उघडल्या. जातीधर्माच्या खुळचट कल्पना नष्ट करण्यासाठी त्यांनी बालिका वसतीगृह सुरू केले. त्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका ठरल्या. आज कर्तुत्ववान अशा सावित्रीबाई फुलेंची जयंती..*
*बालिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालिकागृह सुरू केले होते म्हणून ३ जानेवारी हा दिवस 'बालिका दिन' म्हणून पण साजरा केला जातो.*
तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे ९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पहिल्या मराठी कवयित्री सावित्रीबाईंनी ज्योतिबा नामक सत्यवानाला समाजसेवेसाठी जन्मभर समर्थ साथ दिली. या प्रमाणे बहू अनुमोल उपस्थितांन समोर मार्गदर्शन करीत आपले वक्तव्य मांडले.
यानंतर आभार प्रदर्शन शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा. पी.एम.पाटील सर यांनी व्यक्त करत आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे शिवसेना परिवारा तर्फे आभार व्यक्त केले तसेच याप्रसंगी समाज बांधव तसेच शिवसेनेचे जेष्ट वरिष्ठ पदाधिकारी सर्व नगरसेवक व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.