अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्पवाही, उत्तम कापुस प्रकल्प अंतर्गत सोनुर्ली गाडेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा उत्साहात





 


अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्पवाही, उत्तम कापुस प्रकल्प अंतर्गत सोनुर्ली गाडेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा उत्साहात

चंद्रपूर दि.०३(प्रतिनिधी प्रथम तेलंग)

आज दिनांक 3/1/2022रोजी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्पवाही, उत्तम कापुस प्रकल्प अंतर्गत सोनुर्ली गाडेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमा ला प्रमुख अतिथी डॉ तडवी म्याडम, कार्यक्रमा चे अध्यक्ष सौ गीताताई राजुरकर सरपंच विरुर गाडेगाव. शैलाताई खमानकार उपसरपंच सोनुर्ली. ग्रामपंचायत सदस्य उंदरू पाटिल बांदुरकर, जि. प. शिक्षक पोडे सर, राठोड सर, वरीष्ठ नागरिक पांडुरंग बांदुरकर, अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे रजनी खानोरकर, अश्विनी जेणेकर, सुचिता खडसे उपस्थित होते. कार्यक्रम चे प्रास्ताविक सुचिता खडसे यांनी केले तर संचालन रजनी खानोरकर यांनी केले. या कार्यक्रमात महिलांना बचत गटाचे मार्गदर्शन, शेतीत  महिलांचा सहभाग, शिक्षनाचे महत्त्व, बाल मजुर, स्त्री पुरुष समानता, शेतात काम करताना घ्यावयाची काळजी , आरोग्य, कोविड लसीकरण, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष यांनी उत्तम सहकार्य करून हा कार्यक्रम उत्तम पध्दतीने पार पाडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने