*अंधारलेल्या क्षितीजावर नेहमीच उगवतो.... माणुसकीचा तेजोमय सूर्य सर्वांगीन विकासाचे उत्तुंग* *शिखर गाठण्यासाठी अन्* *खंगलेल्या मनांना उभारी देणारा माणुसकीचा चंद्रमा* *"सचिन बल्लाळ* "

 *अंधारलेल्या क्षितीजावर नेहमीच उगवतो.... माणुसकीचा तेजोमय सूर्य सर्वांगीन विकासाचे उत्तुंग* *शिखर गाठण्यासाठी अन्* *खंगलेल्या मनांना उभारी देणारा माणुसकीचा चंद्रमा* *"सचिन बल्लाळ* "






चंदगडी म्हटलं की डोळ्यासमोर रूपक येतेते रसाळ फणसाचे. पण हा गडी आगळावेगळा आहे. हा रान मेवा आहे. सहजसुलभता समस्यांच्या मुळाशी भिडणारा, आदळआपट, धांगडधिंगाणा नाही. जे काय करायचे ते विचाराने, संयमाने आणि जनताजनार्दनासाठी, बहुजन समाजाची दुःख हलकी करणारा त्यांना मनापासून मदत करणारा प्रत्येकाच्या सुखदुःखात मनापासून झोकून देऊन काम करणारा, परिस्थितीने पिचलेल्या खगलेल्या मनाला उभारी देणारा, त्याना शक्ती देणारा हा कोजागिरीचा माणुसकीचा पूर्णचंद्र म्हणजे श्री सचिन सदानंद बल्लाळ


चंदगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंदगड अर्बन बँकेचे संचालक ते आजचे लोकप्रिय जि. प. सदस्य हा त्यांचा प्रवास आहे. जिल्हा परिषद सदस्यपद खुले असताना ओबीसी प्रवर्गातील सचिन बल्लाळ या तरुणाला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. हे केवळ त्यांच्या कार्याचे उमेदवारा चारित्र्याचे आणि लोक संग्रहाचे बळ आहे. सचिन समोर उभा राहिला कि प्राजक्ताचा सडा ओसडतो. वातावरण सुगंधित बनत. प्रसन्नता, सात्विकता, आनंदी चेहरा, गोरा गोमटा, देखणा तरुण कोणीही प्रेमात पडावं असं व्यक्तिमत्व वडील सदानंद यांच्याकडून कोणत्याही प्रसंगी


पंधीचंदभवन करीना ११ लाखांचा निधीचे योगदान दिले.




चंदगड शहरातील शिवस्मारकासाठि०५ लाख मंजूर करून दिलेत



सचिन जी यांना

सदा आनंदी राहण्याचा वारसा घेऊन चालतो. बल्लाळ घराला उद्योगशील वडील सदानंद बल्लाळ, गुरुनाथ बल्लाळ, वसंत बल्लाळ, मुरलीधर बल्लाळ सर्व उद्योगपती निर्मिती करणे लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, अन्नदान करणे आणि सेवाधर्म हा मूळमंत्र, नफा किती मिळवला यापेक्षा कोणाला  बुडवू नये, लूटू नये,फसवू नये ही पारंपारिकता जपलेला सचिन एखादं झाड भरताना सुद्धा त्याच्या मुळाशी झटलेते हात असतात. आपल्या रोपट्याचा वृक्ष ज्याने केला ते आदरणीय माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांना ते वडील समान मानतात. आपण त्यांचे मानसपुत्र असल्याचा त्यांना आनंद आहे मा. आमदार राजेश नरसिंगराव पाटील, भाजपाचे शिवाजीराव पाटील यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यांच्या विचार प्रवाहात ते आहेत. खेळकर वृत्तीचा सचिन प्रत्येकाच्या सुख-दुःखात न झोकून कार्य करणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व मनापासून आहे. कोरोनाच्या महामारीत पायाला भिंगरी बांधून रुग्णाला मदत आणि लोकांतील भिती घालण्यासाठी ते राबले. हा संस्काराचा पिंड आहे. सत्याची चाड बाळगून चालतो. अन्यायाविरुद्ध दंड थोपटतो. खगलेल्या, थकलेल्या, वैफल्यग्रस्त अवस्थेतील सकल जणांचा हा कान्हा आहे. आचार शुद्ध विचार निर्मळ, बुद्धीने समाजाची प्रगती साधता येते. त्याला बरोबर घेऊन त्याला समजून घेऊन 'सबके साथ चालण्याची त्यांची पद्धत आहे. अध्यात्माचा वारसा आहे. अक्कलकोट स्वामी, देव रवळनाथ, आई बाबा

आणि माझा गरीब शेतकरी ही त्यांची श्रद्धास्थाने आहेत. आपल्या मतदार संघात २५ कोटीची विकास कामे त्यांनी केली आहेत. चंदगड भवनसाठी त्यांनी स्वनिधीतून साडे अकरा लाखांचा निधी दिला आहे. शिव सृष्टी, आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका, शाळा इमारती, अंगणवाडी इमारती, नळपाणी योजना सुविधा, गाव जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, दलित वस्ती सुधारणा, तलाव संवर्धन, सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. पर शिक्षक आल्याशिवाय तिथले शिक्षक पर तालुक्यात जाणार नाहीत. याची खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यात यश मिळवले. महाविद्यालयीन युवतीना संगणक कोर्स उपलब्ध करून दिले. मतदारसंघातील 'क' वर्ग तीर्थक्षेत्र प्रकारात नोंदणी करून मंदिरांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला. भागात नव्या दमाच्या नव्या हातांना कामे देऊन त्याला जीवनात उभा केले. मतदार संघातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतानाच सामाजिक बांधिलकी जपली. चंदगड अर्बनचा संचालक म्हणून काम करताना नेहमीच बँकेचे हित जपले. पण त्याहीपेक्षा छोटे छोटे उद्योजक तयार केले. गोरगरिबांना त्यांची गरिवी ही पत न बघता परतफेड आणि पायावर उभे राहण्याची शक्ती दिली. होतकरू सचिनने परोपकारी गंडा बांधला आहे. सत्कर्म करणाऱ्या त्यांच्या वाटचालीता शुभेच्छा....


सचिन सदानंद बल्लाळ

(जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, संचालक चंदगड अर्बन बँक चंदगड)भावी वाटचालीस लाख लाख सदिच्छा..!

 *_शब्दांकन_* : *समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने