नामांतरलढ्यात लाखो दलितांचे जीवन उद्धवस्त झाले ... जयसिंग वाघ

 नामांतरलढ्यात लाखो दलितांचे जीवन उद्धवस्त झाले  ..         जयसिंग वाघ






जळगाव दि.१३(प्रतिनिधी)       मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करून त्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याकरिता जो 14 वर्षे दलितांना लढा द्यावा लागला त्यात निरपराध लाखो दलितांचे जीवन उध्वस्त झाले अशी माहिती दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीचे मुख्य संयोजक जयसिंग वाघ यांनी दिली

मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून भाषण करतांना वाघ बोलत होते  सुरवातीला त्यांच्याहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले 

जयसिंग वाघ यांनी पुढं असे सांगितले की भारतातच नाही तर जगात एखाद्या महापुरुषांच्या संदर्भात एवढा प्रदीर्घ लढा झाला नाही व एवढे मानवी जीवन उध्वस्त झाले नाही 

सदर प्रसंगी मिलिंद केदार , सुहास बागुल यांची समायोचित भाषणे झाली 

सुरवातीला रमेश देवरुखकर , भागवत जाधव या शहिदाना तसेच विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे , नामदेव ढसाळ  आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली

प्रास्तविक सुहास बागुल , सूत्रसंचालन दिलीप त्र्यंबक सपकाळे तर आभार प्रदर्शन पितांबर भारुळे यांनी केले 

कार्यक्रमास वसंत सपकाळे , पुरुषोत्तम पारधे , बळवंत भालेराव , प्रकाश सरदार , डी एस भालेराव , सुनील निकम आदींसह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने हजर होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने