*वृद्ध कलावंताचे प्रस्ताव गेल्या तिन वर्षापासून पडले धुळखात . . !*


 *वृद्ध कलावंताचे प्रस्ताव गेल्या तिन वर्षापासून पडले धुळखात . . !*                               

वाशिम दि.१५(प्रतिनिधी) :  गेल्या विधानसभा निवडणुकांपासून, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशीमच्या " वृद्ध साहित्यीक कलाकार समिती " चे गठण झालेले नसल्यामुळे, गेल्या तिन वर्षापासून जिल्ह्यातील कलाकारांचे प्रस्ताव धुळखात पडलेले असून, कलावंताच्या प्रस्तावाला अद्यापही मंजूरी नसल्यामुळे, जिल्ह्यातील कलावंताची एकप्रकारे शासनाकडून उपेक्षाच होत असल्याचे चित्र आहे . महाराष्ट्र शासनाने, वयोवृद्ध कलावंताची म्हातारपणी परवड होऊ नये . त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था व औषधोपचाराची व्यवस्था व्हावी म्हणून ही योजना सुरु केलेली होती . सध्या गेल्या अडीच वर्षापासून कोव्हिड - 19 कोरोना महामारीमुळे, लोककलावंताचे जनजागृतीचे कार्यक्रम बंद पडलेले असून, कार्यक्रमच करता येत नसल्यामुळे कलावंत फार मेटाकुटिला आलेला आहे त्यात म्हणजे कलावंतानी मानधनाच्या आशेने हजारो रुपये खर्च करून शासनाकडे पाठविलेले, मानधन मंजूरीचे प्रस्ताव सुद्धा, वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे गठन नसल्यामुळे व गेल्या तिन वर्षाच्या समिती बैठकाच झालेल्या नसल्यामुळे धुळ खात पडलेले आहेत . तरी शासनाने कलावंताच्या विषयावर गंभीर होत, मानधन लाभार्थी निवड समितीचे गठन करण्याची व गेल्या तिन वर्षाच्या तिन बैठका घेऊन कलावंताचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी, विदर्भ लोककलावंत संघटनेचे, उमेश अनासाने यांनी केली आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने