*नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगर पालिकेविरोधात तिव्र आंदोलन छेडणार !*
कारंजादि.१५(प्रतिनिधी) : कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस मांडलेला असून चौका - चौकात पन्नास ते साठ कुत्र्यांच्या झुंडा ठाण मांडून असतात . शहरातील न . प . कार्यालयासमोरील महाराणा प्रताप चौक, अस्ताना व जीजामाता चौक, भ. महाविर चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौकात मोकाट कुत्र्यांचे जत्थेचे जत्थे असतात . त्याचा अनेक वेळा दुचाकी, चारचाकी वाहनांना तर त्रास होऊन अपघात होत आहेत . शिवाय रुग्नालय - दवाखान्यात जाणारे रुग्न, महिला, लहान बालक, शाळकरी मुले मुली यांना त्रास असून ते जखमी होत आहेत . परंतु कारंजा नगर पालिकेचे, शंभर टक्के दुर्लक्ष्य असून, जबाबदारी घ्यायला न प . तयारच नाही . त्यामुळे कुत्र्याच्या हल्ल्यात कारंजा येथील बालकांचे प्राणावर बेतण्याची शक्यता नाकारता येणार नाही . याबाबत अधिक वृत्त असे की, मंगळवार,दि.११/०१/२०२२ रोजी, अस्ताना येथील एका बालकाला, मोकाट कुत्र्याने जीवघेण्या हल्लात एका बालकाच्या हाताच्या बोटाला भयंकर चावा घेऊन गंभीर जखमी केले . त्यानंतर आणखी परत एकदा दि .१२ जानेवारी रोजी तशीच घटना घडून, पिसाळलेल्या कुत्र्यांनी एका महिलेला चावा घेत गंभीर घेतले .शिवाय यावेळी इतर कुत्रेही तुटून पडले होते . त्यामुळे कारंजा येथील शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष मो सलिम तेली, शहर अध्यक्ष जुबेर खान, पं. स सदस्य देवानंद देवळे, अनिस हाजी, सैय्यद आयाज, नासिर खान यांनी कारंजा येथील प्रमुख प्रशासकीय अधिकारी असलेले, उपविभागीय अधिकारी साहेब व न प चे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, तहसिलदार धिरज मांजरे यांना तात्काळ लेखी निवेदन देऊन, नगर परिषदे द्वारे , गावात हैदोस मांडणाऱ्या या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली होती . परंतु एवढ्या गंभीर व संतापजनक घटना घडूनही संबधित अधिकारी जर कर्तव्यावर अनुपस्थित राहून, ऐकून न ऐकल्यासारखे करत चालढकल करीत असतील तर लवकरच, कारंजा येथील नागरिकांना नगर पालिकेवर मोर्चा काढीत, न प कार्यालयातच कुत्री सोडावी लागतील व तिव्र असे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा तक्रारकर्त्या नागरिकांनी दिला आहे .