गडकरी रंगायतन ठाणे येथे बहुरंगी बहुढंगी नमनाचे आयोजन






 गडकरी रंगायतन ठाणे येथे बहुरंगी बहुढंगी नमनाचे आयोजन


मुंबई दि.२२ (शांताराम गुडेकर)

             कोकण ही कलारत्नाची खाण म्हणून ओळखले जाते. याच कोकणात नमन, जाखडीनृत्य कोकणात प्रसिद्ध आहे. नमनही देखील महाराष्ट्रातीलच लोकप्रिय लोककला आहे. नमन या लोककलेला वाव मिळावा म्हणून सर्व रंगकर्मी व रसिकजण मेहनत घेत असताना दिसून येते.कोकणातील कलावंतांना मुंबईतील मोठ्या रंगमंचावर आपली कला सादर करण्याची संधी अविअनिल कलामंच देत असतात. तसेच अनेक कलाकारांना घडवणारे, व संधी देणारे पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंच मुंबई प्रस्तुत,श्री.भार्गव कदम आणि कु. शैलेश कुवार घेऊन येत आहेत.रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता, गडकरी रंगायतन ठाणे (प.) येथे बहुरंगी बहुढंगी नमनाचा कार्यक्रम गण, गवळण, आणी संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास सांगणारे एक ज्वलंत वगनाट्य "अजिंक्य योद्धा अर्थात शिवाचा छावा शंभुराजा."निर्माता/संकल्पना/लेखक/दिग्दर्शक: अविनाश गराटे. गिते व गायक :शाहीर अनिल गराटे. गायक: एकनाथ डिके, गायिका:प्रिती भोवड-विर.मेकप/हेअरस्टाईल/काँस्टयुम डिझाईनर :विद्या तुपे. नृत्य दिग्दर्शिका -तेजल पवार (गोताड) प्रकाश योजना :रमाकांत घाणेकर. मॅनेजमेंट :राहूल पवार /गणेश देवकड. कलाकार :दिग्गज सिनेअभिनेते मा.श्री.सुनिलजी गोडबोलेसर एका चित्तथरारक भुमिकेत पहायला मिळणार आहेत, अनिल गराटे, शैलेश कुवार, भार्गव कदम, अंकुश थेराडे, अजय ओर्पे, निलेश बढे, सुरज, परब, केदार महाजन, रमेश हतपले, सतिष बंडबे, ओमकार गिडये, आणी प्रज्ञा वारंग ,जान्हवी कोळवणकर, तृप्ती भोवड, प्रगती ठोंबरे, वृषाली माचिवले, जान्हवी सातपुते, समिक्षा टेमकर असुन शासनाच्या नियमाचे पालन करुन च कार्यक्रम पार पाडण्यात येईल असे पार्वतीपुत्र निर्मित अविअनिल कलामंचाचे निर्माते अविअनिल यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने