*सेंद्रिय शेती काळाची गरज...*श्री संतोष वाळके तालुका कृषी अधिकारी
कारंजा* लाड दि.२२ (प्रतिनिधी): रवींद्र गायकवाड यांच्या शेतामधील शेतकऱ्याची बांधावरील प्रयोगशाळा व गांडूळ खत युनिट ला तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके साहेब व त्यांच्या टीमने भेट दिली त्यावेळी ते बोलत होते
संत गाडगेबाबा सेंद्रिय शेतकरी बचत गट द्वारा संचालित सेंद्रिय लॅब गायवळ याठिकाणी बायोडायनामिक पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करायची याविषयी वेगळ्या प्रकारचे प्रयोग तयार करण्यात आलेले आहे सदर प्रयोग शेतकऱ्यांनी त्यांच्या बाधावरती केल्यास शेतामधील उत्पादन खर्च नक्कीच कमी होईल यामध्ये शंका नाही
सदर भेटीमध्ये तालुका कृषी अधिकारी यांनी नाडेप कंपोस्ट युनिट या विषयी सखोल माहिती व मार्गदर्शन केले तसेच कारंजा तालुक्यातील सर्व मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रकाशित करण्यात यावी करिता श्री रविंद्रजी गायकवाड अध्यक्ष संत गाडगेबाबा सेंद्रिय शेतकरी बचत गट गायवळ