*समान न्याय समान विकास हे काँग्रेसचे ध्येय* - माणिकराव ठाकरे
*अकोला बाजार* दि.०३ (प्रतिनिधी प्रवीण राठोड): समान न्याय समान विकास हे काँग्रेसचे ध्येय आहे , काँग्रेसचे हे विचार जनतेपर्यंत पोहचवि्ण्याकरीता कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत जोमाने कामाला लागावे , कोणत्याही जातीपातीचा विचार न करता युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहुन काँग्रेस पक्षाचे विचार पुढे न्यावे , कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने यवतमाळ जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही , असा विश्वास काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. अकोला बाजार येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्षस्थानी ते बोलत होते . त्यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमीत्य उत्तम असा कार्यकर्ता मेळावा आयोजीत केल्याबद्दल जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचे कौतुक केले . यावेळी काँग्रेस कार्यकाळात रोजागार हमी योजना , घरकुल सारख्या योजना ग्रामिण भागात उत्तमपणे राबविल्याचे मनोगत माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वासुदेव महल्ले , सुनील भेले , प.स. उपसभापती उज्वला गावंडे उपस्थीत होते . तसेच कृ.उ.बा.स. चे सभापती रवींद्र ढोक , धनराज चव्हाण , मोरे महाराज , नारायण राठोड, संजय शिवणकर , जातकर , रमेश भिसनकर , जाकीर काजी , प्रवीण जयस्वाल , डा.कृष्णराव कावळे मंचावर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मांगुळकर यांनी केले . संचालन बबलु देशमुख आणि आभार पांडुरंग कराळे यांनी मानले . यावेळी कोरोना दुत गजानन घुले , अंजली टेकाळे , रुकय्या पठाण , संगीता राठोड यांचा माणीकराव ठाकरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.