*गरिबांचे डॉक्टर* *डॉ. परवेझ मुजावर डॉ. अविनाश पवार डॉ. दत्तात्रय तोरडमल व त्यांच्या पूर्ण टीम च्या प्रयत्नामुळे त-हाडी येथील भाग्यश्री संजय गोसावी हीचा जिव वाचला*
*त-हाडी ता.शिरपूर,दि.०३( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे )
```सामाजीक बांधीलकी जपत रुग्णांची अंतकरणातुन सेवा करणारे डॉ. परवेझ मुजावर, व त्यांची टीम यामध्ये डॉ अविनाश पवार , डॉ दत्तात्रय, डॉ. हर्षल यांच्या सर्व पॅरामेडिकल स्टाफच्या सहकार्याने श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय धुळे येथे मुलीचे प्राण वाचवले .
सविस्तर वृत्त असे कि श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय धुळे हे दर महिन्याला पंतप्रधान जन आरोग्य योजना च्या माध्यमातुन त्या ठिकानच्या त-हाडी येथील भाग्यश्री गोसावी हीची 23/10/21 रोजी तब्बेत बरोबर नव्हती मुलीला खाजगी दवाखान्यात कोणीही घेत नसल्याने तालुक्यातील त-हाडी येथील मुलगी भाग्यश्री गोसावी हिला 25/10/21 रोजी गॅस गँगरीन हा आजार होता वडील संजय गोसावी यांनी शिरपूर शहरातील व धुळे शहरातील सर्व दवाखान्याचे दरवाजे ठोठावले पण कोणीही प्रतिसाद देत नव्हते परंतु संजय गोसावी यांनी पेशंट हिरे मेडिकल जिल्हा रुग्णालय येथे
नेले . त्यावेळेस डॉ. परवेझ मुजावर यांनी तपासणी करून आपली जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करून देतो असे म्हणुन सांगितले त्याच दिवशी तिचे रात्री 10 वाजता पाहिले ऑपरेशन करण्यात आले. याच प्रकारे तिचे सात वेळा ऑपरेशन झाले . गॅस गॅंग्रीन हा आजार बरा करणे हे डॉक्टरांना एक प्रकारे आव्हान होते. आणि ते त्यांनी यशस्वी रित्या पार पाडले . प्रत्यक्षात 8 डिसेबर 2021 रोजी तिचे त्वचा प्रत्यारोपण चे ऑपरेशन डॉ. कल्पेश बोरा व डॉ. हर्षल यांच्या द्वारे घेण्याची शस्त्रक्रिया पार पाडली. याकामी यांनी डॉ. दिघे, डॉ. परवेझ मुजावर, डॉ. अविनाश पवार, डॉ. बोरा , डॉ. दत्तात्रय, डॉ. मोहम्मद असद, डॉ. कार्तिक यांनी सहकार्य केले व शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडुन मुलीचे प्राण वाचवले या स्तुत्य सामाजीक उपक्रमाबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.```