आरोग्यखाते कंत्राटी सफाई कामगारांची जिल्हा उप रुग्णालया समोर जोरदार निदर्शने ..!


 




आरोग्यखाते  कंत्राटी सफाई कामगारांची जिल्हा उप रुग्णालया समोर जोरदार  निदर्शने ..!


 चोपडा दि.१३(प्रतिनिधी)..चोपडा येथील जिल्हा उप रुग्णालय, तसेच अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार यांनी चोपडा उप रुग्णालय समोर आज रोजी दुपारी १२वाजता कामगार नेते कामरेड अमृत महाजन यांचे नेतृत्वात जोरदार निदर्शने केली. व  त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व त्यांचा थकीत पगार अदा करावा अशी मागणी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , है सर्व बेरोजगार/

सुशिक्षित बेरोजगार आरोग्य खात्यातील सेवा कंत्राटी करण अंतर्गत   एक ते सात वर्षे  सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहेत  त्यात चोपडा जिल्हा उप रुग्णालय अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी चा समावेश आहे. किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन बरोबर चोपड्यातील कर्मचाऱ्यांना ५/५ महिन्यांचे वेतन दिले नाही आणि २महिन्यापूर्वी कामावरून कमी केले आहे या सर्व रुग्णाल यीन कर्मचारी यांनी.कोविड 19काळात जीव धोक्यात घालून  काम केले पण  त्यांना दोन महिन्यापूर्वी ठेकेदारांनी बंद केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे थकीत पगार द्यावा त्यांना आरोग्य खात्यात कायम करावे अशी मागन्यांसाठी जळगाव जिल्हा आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटक ने  आज  जिल्हा रुग्णालयात समोर  वाजता काळे मास्क घालून निदर्शने केली आहेत  या निदर्शनात  ऋषिकेश महाजन निलेश माली, मयुर नेवे, राकेश नवल पाटील मंगला साबळे  अशोक सोनवणे रउफ मेहतर  यांनी यांनी भागीदारी केली मेडिकल ऑफिसर डॉक्टर मनोज पाटील यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असून केलेली कार्य वाही कळवतो म्ह नुण सांगितले  .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने