*जिल्हाधिकाऱ्यांनी चेडूं लोटला जिल्हा परिषद कडे.. आतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कलावंताना अर्थ सहाय्य लवकर करतील काय?*
कारंजा लाड ,वाशिम दि.१४(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री मा . उद्धवरावजी ठाकरे यांनी, दिपावलीला, कोरोना संकटामुळे हाताला काम नसणाऱ्या म्हणजेच कोरोना संचारबंदीने, भजन, किर्तन, गोंधळ जागरण, शाहिरी, कलापथक इ लोककलेचे कार्यक्रम बंद झाल्याने संकटात सापडलेल्या कलावंताना, पाच पाच हजार रु अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली होती व त्यानुसार शासनाने, तहसिलदारांमार्फत, दि . ३१ डिसें.२०२१ पर्यंत प्रस्ताव मागीतले होते तथापी कलावंतानी वेळेवर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले . आणि प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात, वाशिम जिल्ह्यातून एकूण २३ प्रस्ताव प्राप्त झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने तेवीस प्रस्ताव : जा.क्र.कक्ष-18/क.लि./विविध कावि-10/2022अन्वये दि. 04/01/2022 रोजी सदर्हु प्रस्ताव, पुढील कार्यवाही करीता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे सुपूर्द केले आहे . शासनाच्या नियम व अटी मुळे जिल्ह्यातून केवळ तेविस कलावंतानीच एकरकमी प्रस्ताव सादर केलेले आहेत . तरी समाज कल्याण आधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, कोरोना - ओमायक्रानचे संकट, परत एकदा लागलेले लॉकडाऊन आणि कलावंताची नाजुक परिस्थिती पहाता विनाविलंब तेविसही कलावंताना तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी, कलावंताकडून होत आहे .