आदिवासी भागात महाशिबिराला आरोग्य अधिकारी यांनी दिली भेट.
चोपडा दि.०३ ( प्रतिनिधी)नवीन वर्षात जिल्हा आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर ता-चोपडा अंतर्गत आज कुपोषित मुले, गर्भवती, सुतीका माता, मोतीबिंदू रुग्णासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर आणि समता फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने... आरोग्य अधिकारी-डॉ.जमादार,डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
हे शिबीर यशस्वी संपन्न झाले.
यात नेत्र रोग शिबिरासाठी 70 रूग्ण तपासून 28 मोतीबिंदू रूग्ण शोधण्यात आले,
सोबत 70 गर्भवती, 22 सुतीका, 22 बालके यांची देखील तपासणी करण्यात आली,
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ भामरे मॅडम, डॉ वाल्मिक पाटील बालरोग तज्ञ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र पवार, डॉ सुनील बारेला, डॉ शोएब, डॉ इम्रान, डॉ मोनिका हांडे, डॉ चव्हाण,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-प्रशांत बोरसे आदी सर्व आरोग्य कर्मचारी,नेत्र चिकित्सा अधिकारी, प्रयोग शाळा अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक-विजय झाम्बरे,सर्व कर्मचारी वृंद वैजापूर या सर्वांनी शिबीर यशस्विते करिता परिश्रम घेतले.
शेवटी सर्वांचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र पवार यांनी आभार मानले.