*रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठी आशा - जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*
धरणगाव दि.०३( प्रतिनिधी)
जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी सी.आर. गेट 18 व शाखा कालवा 1 निमनगिरणा कालव्याचे जलपुजन करुन पाटास पाणी सोडले.
धरणगाव तालुक्यातील बळीराजा रब्बी हंगामाची मशागत करण्यात व्यस्त आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगाम वाया घालवला असला तरी रब्बी हंगामाची शेतकऱ्याला मोठी आशा आहे.गेल्या काही दिवसांपासून पाऊस पूर्णपणे उघडला थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी आशा बळीराजाला आहे. शेतीचे उत्पादन वाढून शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत सिंचन निर्माण होणे आवश्यक आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी शाश्वत सिंचनासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने पाणी अर्ज भरावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केले. याप्रसंगी उपस्थित गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एस पि चव्हाण, वराड सरपंच व कर्मचारी