पंकज प्राथमिक विद्यालयात ३ जानेवारी बालिका दिन उत्साहात साजरा....

 




 पंकज प्राथमिक विद्यालयात ३ जानेवारी बालिका दिन उत्साहात साजरा....

   चोपडा दि.०३ (प्रतिनिधी) :---

        येथील पंकज प्राथमिक विद्यालयात ३ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विद्यालयातील शिक्षिका श्रीमती गायत्री शिंदे, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती प्रियंका पाटील व इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

     विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की ,सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या .सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी पती-पत्नी म्हणून मुलीसाठी १८ शाळा स्थापन केल्या. १८४८ मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे देशातील पहिली बालिका शाळा स्थापन केली. सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी बालिका दिन साजरा केला जातो.

      सदर कार्यक्रम प्रसंगी सी एस जाधव, अनिल पाटील, डी एम जैस्वाल, आर डी पाटील, श्रीमती गायत्री शिंदे ,जयश्री पाटील, प्रियंका पाटील, मनोज अहिरे ,प्रशांत पाटील ,गोपाल पाटील ,महेश गुजरआदी शिक्षक उपस्थित होते.

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर पाटील, सईद शेख, दिलीप बाविस्कर, रवि शार्दुल, कैलास बोरसे, प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने