धानोरा चौफुलीवर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी‌ ६ रोजी रास्तारोको आंदोलन






 धानोरा चौफुलीवर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी‌ ६ रोजी रास्तारोको आंदोलन

चोपडा दि.०५ (प्रतिनिधी) तालुक्यातील धानोरा चौफुलीवर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी‌ रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

दिनांक 6 जानेवारी 2022 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता धानोरा चौफुलीवर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या केळीला बोर्ड प्रमाणे भाव मिळावा कापसाला 10000 रुपये प्रमाणे भाव मिळावा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे बंद करावेत कांद्याला व इतर पिकांना हमी भाव मिळावा या मागण्यांसाठी संतोष सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून तरी सर्व शेतकरी बांधवांनी रास्ता रोको साठी हजर राहावे असे संतोष सपकाळे व शेतकरी बांधव यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने