राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे पत्रकार सतिश भालेराव यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ चोपडा तहसीलदारांना निवेदन

 




राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे पत्रकार सतिश भालेराव यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ चोपडा तहसीलदारांना निवेदन 

चोपडा दि.२५(प्रतिनिधी) : राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नागपूर जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती चे पत्रकार सतीश भालेराव यांना हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील पुसद येथील धाडसी पत्रकार यांच्यावर तीस ते चाळीस गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला व पत्रकारांच्या जवळील वृत्तांकन साठी अंदाजे 80 हजार रुपये किमतीचे सामान लुटून नेले त्याचा निषेध करत चोपडा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यावेळी चोपडा तालुका अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष हेमकांत गायकवाड,उपाध्यक्ष डाँ सतिष भदाणे,सचिव विश्वास वाडे,संघटक मिलिंद वाणी सहसंघटक महेश पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने