*चोपडा कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी*






 *चोपडा कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी*

 चोपडा दि.०३ ( प्रतिनिधी) मनुस्मृतीने स्रियांचा शिक्षणाचा नाकारलेला अधिकार परत मिळवून देण्यासाठी प्राणांतिक प्रयत्न करून ज्यांनी स्त्री शिक्षणाचा ज्योत लावली त्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती निमित्त महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात चोपडा येथे त्यांना अभिवादन करणाऱ्या कार्यक्रमाचे दि.०३ जानेवारी २०२१ रोजी ९.१५ वाजता आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांच्या हस्ते सवित्रीमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी अनुक्रमे ११ वी कला व वाणिज्य वर्गातील कु.हर्षदा सोनवणे व कु.निकिता पारधी यांनी  मराठी व इंग्रजी भाषेतून सवित्रीमाईंच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषण दिलीत.

उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांनी अध्यक्षयी भाषणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्तविक व आभार कार्यक्रमाचे आयोजक प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले 

तर, कार्यक्रमात प्रा.सौ.सुनंदा नंन्नवरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने