पथराड गावाच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य...जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील*

 




*पथराड गावाच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य...जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील*

पथराड खुर्द दि. २ (प्रतिनिधी) पथराड खुर्द गावाने ना. गुलाबरावजी पाटील यांच्यावर व माझ्यावर आतोनात प्रेम केलंय त्यातून उतराई होणे अशक्यच असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले ते पथराड गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

प्रताप पाटील पुढे म्हणाले की गावाचा विकास साधायचा असेल तर मतभेद विसरून कामे करावी लागतात तरच विकासाला गती मिळू शकते आणि ते कार्य पथरड गावाने करून दाखवले त्यामुळेच विकसनशील गावांमध्ये पथराड ची गणना होते आहे. माझ्या विनंतीला मान देऊन पथराड गावाने ग्राम पंचायत बिनविरोध केल्या बद्दल गावकऱ्यांचे आभार ही त्यांनी मानले.

पथराड खुर्द गावासाठी २९ लाखाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले त्यात प्रामुख्याने संरक्षक भिंत १८लक्ष,पेव्हारब्लोक ११ लक्ष तसेच पथराड ते एकलग्न रस्त्यासाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले

या प्रसंगी व्यासपीठावर माजी सरपंच गोकुळ लंके उत्तम भिल आत्मा समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील शेरी चे सरपंचकैलास पाटील.दत्तू ठाकूर रेल चे सरपंच प्रशांत पाटील अमोल पाटील शरद शिंदे पथराड खुर्द सरपंच पप्पू पाटील दिलीप बोरसे प्रगतिशील शेतकरी कैलास पाटील ग्रा प सदस्य गजानन पाटील मनोज पाटील श्रीकांत चव्हाण दीपक साळवे सौरभ पाचपोळ अनिल पाचपोळ धार ग्रामसेवक शामसुंदर पाटील शिपाई बापू पाटील दयाराम चव्हाण आदी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने