*विज्ञानत्रम टेक्नॉलॉजी आणि पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन वेबिनार सत्राचे आयोजन.....*
चोपडादि.२९( प्रतिनिधी) :--
चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल व विज्ञानत्रम टेक्नोलॉजी यांनी संयुक्तरीत्या भारतातील सर्वात मोठ्या वेबिनारचे आयोजन केले. विद्यार्थांनी सर्व क्षेत्रात पारंगत होऊन यश संपादन करावे, नैपुण्य मिळावावे, आज युग तंत्रज्ञानाचे आहे , भविष्य रोबोटिक्सचे आहे तसेच सोशल मीडियावर होणारी फसवणूक यासंबंधीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रात त्याने प्रगतशील असावे असा मानस पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादासो डॉ. सुरेश पंडित बोरोले यांचे आहे व नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी शिकावे आत्मसात करावे. यासाठी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रात सक्षम बनण्यासाठी संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा विविध कार्यक्रम राबवत असते.
सध्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नाही व बराच वेळ विद्यार्थ्यांकडे आहे, तर या मिळालेल्या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन करून माहिती देण्यात यावी यासाठी या वेबिनार सत्राचे आयोजन करण्यात आले. हे वेबिनार विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या *विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणात रोबोटिक्स*
इयत्ता सहावी ते आठवीसाठी *सायबर फसवणूक पासून सुरक्षित कसे*
इयत्ता नववी ते बारावीच्या *विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे अंमलबजावणी*
अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेबिनार च्या आयोजनासाठी प्राचार्य मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक किरण चौधरी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ह्या चर्चासत्रासाठी शुभम कुमार आयआयटी दिल्ली यांनी मार्गदर्शन केले...