महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यत मुदत..सहाय्यक आयुक्त समाज कल्याण याचेकडे अर्ज सादर करावेत


 


महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यत मुदत..सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  याचेकडे अर्ज सादर करावेत

          जळगाव, दि. 29(प्रतिनिधी) :-  महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार नियमावली बाबतचा शासन निर्णय दि. 08 मार्च 2019 रोजी निर्गमीत करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहीत्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थाच्या कामाची दाद / दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहीत्यिक सरसावुन पुढे यावेत याकरीता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थासाठी एक असे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.

                सदर पुरस्कारासाठी पात्रता बाबतची नियमावली दिनांक 8 मार्च, 2019 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली असुन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर संबंधित शासन निर्णय उपलब्ध करुन देण्यात आला  असून त्याचा संकेतांक 201903082039003522  असा आहे.

                जळगाव जिल्ह्यातील इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी सदर पुरस्करासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव          डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर जळगाव यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह योग्य ती माहिती जोडून सीलबंद लिफाप्यात दिनांक  31 जानेवारी, 2022 पर्यत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने