पाळधी खु येथे तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत श्री स्वामी समर्थ केंद्राचे 30 लाख रुपयांचे सभागृह कामास सुरुवात
पाळधी दि.१९(प्रतिनिधी) येथे आमचे आजोबा उदरनिर्वाहासाठी आले. या मातीत माझे वडील आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री झाले. मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य झालो. आम्हाला पाळधी गावाने भरभरून दिले आहे याचे ऋण आम्ही फेडू शकणार नाही.
पाळधी खु येथे तीर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत श्री स्वामी समर्थ केंद्राचे सभागृह किंमत 30 लाख मंजूर होऊन काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी आज जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केली.
पाळधी बु आणि पाळधी खु गावांसाठी लवकरच 21 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेली असून पाणीपुरवठा केंद्रासाठी 2 एकर जागा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नाहरकत मिळालेली असून लवकरच भूमिपूजन करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी राजू भाऊ पाटील, शरद कोळी सरपंच पाळधी खु मनोज माळी, फारूक मिस्त्री उपस्थित होते.