स्वप्निल ईश्वरलाल जैन यांना मानसिक व आर्थिक ञासापोटी धरणगांव प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्थेने भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश
धरणगाव दि.३०(प्रतिनिधी):
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगांव यांच्या कडून धरणगांव प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था मर्यादीत धरणगांव यांच्या कडे श्री स्वप्निल ईश्वरलाल जैन यांना मानसिक व आर्थिक ञासापोटी रक्कम रूपये 10,000/व नुकसान भरपाई म्हणून 5000/देण्यात यावे असे आदेश नुकतेच दिले आहेत.
सविस्तर बातमी अशी की धरणगांव प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्था मर्यादीत धरणगांव यांच्या कडे श्री स्वप्निल ईश्वरलाल जैन यांनी दि 17/09/2014रोजी 13महिन्याभरासाठी 80,000/रूपये माञ महालक्षमी मुदत ठेव योजना नुसार रक्कम जमा केली होती परंतु सदर देय तारीखे नुसार बँकेकडील मागणी केली असता त्यांनी वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करून सदर बँकेने रक्कम देण्यास नकार दिला होता म्हणून श्री जैन यांनी दि 08/02/2019रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांच्या कडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने दि 22/12/2021 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांचे मुख्य न्यायमूर्ती श्री मती पूनम नि.मलीक प्रभारी अध्यक्षा/सदस्या व श्री सुरेश मो.जाधव सदस्य यांनी प्रियदर्शनी महिला सहकारी पत्संस्था मर्यादित धरणगाव यांचे संचालक बॉडी ला आदेश दिले की श्री स्वप्निल जैन यांना 2मध्ये नमूद दिनांक पासून एकञित रक्कमेवर द.सा.द.शे. 9टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होई पावेतो देण्यात यावे व क्र 1,3ते 13यांना वैयक्तिक अथवा संयुक्तीकरीता यांना असेही निदैशित केले की यास मानसिक व आर्थिक ञासापोटी रक्कम रूपये 10,000/व नुकसान भरपाई म्हणून 5000/देण्यात यावे असे आदेश पारित केले असून गावातील ठेवीदारांनी श्री स्वप्नील जैन यांचे अभिनंदन केले व श्री जैन यांनी ग्राहक मंच आयोगाचे आभार व्यक्त केले