तालुक्यातील ३० तलाठी सजांच्या कार्यालयासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर..तलाठी संघटनेतर्फे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार
चाळीसगांव दि.२५(प्रतिनिधी): तालुक्यातील ३० तलाठी सजांच्या कार्यालयासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आज तलाठी संघटनेतर्फे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार केला.
मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल हा महसूल प्रशासनाचा ग्रामीण भागातील कणा आहे मात्र त्यांनाच काम करण्यासाठी हक्काचे कार्यालय नसल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेसाठीच्या सेवेवर होत असतो. नाईलाजाने तलाठी-मंडळाधिकारी यांना भाडेतत्त्वावर खोलीत अथवा ग्रामपंचायत च्या एखाद्या जुन्या इमारतीत कार्यालय चालवावे लागत आहे पण आता आम्हाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे सुसज्ज तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय मिळत असल्याने तलाठी संघटना चाळीसगाव यांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले.