मुंबईला आदिवासी जमातींचे धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी.. जगन्नाथ बाविस्कर

 




*मुंबईला  आदिवासी जमातींचे धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी.. जगन्नाथ बाविस्कर

*चोपडा दि.२५ (प्रतिनिधी)..* महाराष्ट्र राज्य आदिवासी संघर्ष समिती व 

आदिवासी कॄती सामाजिक समन्वय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 

आदिवासी लोकनेते

डॉ.दशरथ भांडे यांच्या नेतृत्वात

सरकार व आदिवासी विकास विभागाच्या विरोधात महाराष्ट्रातील अन्यायग्रस्तं आदिवासी जमातींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दि.२७/१२/२०२१(सोमवार) रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

याठिकाणी आदिवासी संघर्ष समिती संस्थापक डॉ.दशरथ भांडे,

आदिवासी कॄती सामाजिक समन्वय संस्थाध्यक्ष  श्यामजी सोनकुसळे,

राज्यमार्गदर्शक भास्करराव कोलटके,राज्यसमन्वयक प्रशांत तराळे,

राज्यकार्यकारिणी सदस्य प्रभाकर सोनवणे 

यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच याठिकाणी 

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  प्रल्हादराव सोनवणे,

जळगाव जिल्हाध्यक्ष  नितीन  कांडेलकर,

राज्यप्रवक्ते मंगल कांडेलकर,

महिला जिल्हाध्यक्ष सुनिता  कोळी,कर्मचारी जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे,युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत सोनवणे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर,जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ सोनवणे, शंभूअण्णा शिवरे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.याठिकाणी आदिवासी बांधवांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन चोपडा म.वाल्मिकी  कोळी समाज मंडळाचे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने