न्याहळोदला १८ रोजी इच्छापूर्ती गुरुदत्त मंदिर यात्रा महोत्सव








न्याहळोदला १८ रोजी इच्छापूर्ती गुरुदत्त मंदिर यात्रा महोत्सव

 न्याहळोद दि.१७(प्रतिनिधी):  येथे सालाबादप्रमाणे या वर्षी दि १८ रोजी इच्छापूर्ती गुरुदत्त मंदिर यात्रा महोत्सव आयोजित केला आहे .कोरोना नियम पाळून व लसीकरण कार्यक्रम ठेऊन जयंती साजरी होणार आहे . 

      सकाळी  आठ वाजता रुद्राभिषेक , हरिपाठ , पालखीसोहळा व प्रसादाचा कार्यक्रम असे नियोजन आहे .रात्री  मंदार महाराज जोशी( भुसावळकर ) यांचे कीर्तन असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आहवान मंदिराचे अध्यक्ष अँड .  चुनिलाल रोकडे यांनी केले आहे .

        मंदिर प्रशासन  यात्रेनिमित्त कृषी मेळावा , पशु मार्गदर्शन  ,  कीर्तनातून दारूबंदी , समाज प्रबोधन असे  सुत्यउपक्रम राबवित असते . यावर्षी कोरोनाचे  संकट लक्षात घेऊन कोविड लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . ज्या भाविकांचे दोघे किंवा एक डोस बाकी असेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे . मंदिरात येतांना मोबाईल व आधार कार्ड आणावे असे आयोजकांनी सूचना दिल्या आहेत .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने