*जळगाव जिल्ह्याची केळी प्रति हेक्टर उत्पादन क्षमता 62 मेट्रिक टन आहे. सर्वोच्च 82 मेट्रिक टन करण्याकडे आपले प्रयत्न सुरू - जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील

 






*जळगाव जिल्ह्याची केळी प्रति हेक्टर उत्पादन क्षमता 62 मेट्रिक टन आहे. सर्वोच्च 82 मेट्रिक टन करण्याकडे आपले प्रयत्न सुरू - जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*

जळगाव दि.१७ (प्रतिनिधी)कृषी विभाग, जिल्हा परिषद, जळगाव व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी अमृत महोत्सव अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अनुसूचित जाती, जमाती, नवबौध्द शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना विषयक कार्यशाळा पिलखेडा ता.जि.जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. 


1.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

2.बिरसा मुंडा कृषी योजना

3. राष्ट्रीय कृषी योजना यांची माहिती होण्यासाठी व फॉर्म भरून घेण्यासाठी डॉ.कमलाकर पाटील माजी सरपंच फुपनी व सौ.शितलताई कमलाकर पाटील मा. उपसभापती  यांच्या द्वारे आयोजन करण्यात आले होते.


कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथील शास्त्रज्ञांकडून केळी व्यवस्थापन, पशुधन विकास यावर मार्गदर्शन केले. 


जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की

केळी प्रति हेक्टर उत्पादनक्षमता जगाची 82 मेट्रिक टन, देशाची 32 MT, 

महाराष्ट्राची 52 MT च्या तुलनेत

जळगाव जिल्हा 62 MT एवढी प्रचंड आहे. 


केळीला दर मिळाला पाहिजे. पालकमंत्री साहेब केळी महामंडळ स्थापन करण्यासाठी आग्रही आहेत. 


exporter एकगठ्ठा 100 एकर क्षेत्र केळी मागतात. 

त्यासाठी 10 ते 12 शेतकरी एकत्र येण्याची गरज


केळीला Low chemical व GI टॅग लावून 

युरेपीयन देशात केळी एक्स्पोर्ट करता आली पाहिजे. 


आज केळी एक्स्पोर्ट मध्ये देशाचा 121 वा नंबर आहे. या मध्ये सुधारणा होण्यासाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळी पिकवण्याचा प्रयत्न करावाअसे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी कृषी अधिकारी सोनवणे मॅडम, जंगले साहेब, कृषी शास्त्रज्ञ, विस्तार अधिकारी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने