*ग.स.तर्फे वधूपित्यास राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा लाभ..*
*चोपडा दि.१७(प्रतिनिधी)* जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव (ग.स.सोसायटी) तर्फे सभासदांना मुलींच्या लग्नप्रसंगी राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेअंतर्गत चेकद्वारे अ.रू.पाच हजार मात्रचा लाभ देण्यात येत असतो.त्यानुसार चोपडा शाखा नं.१ येथील सभासद व प्राथ.शिक्षक ज.दा.बाविस्कर यांच्या मुलीच्या लग्नप्रसंगी त्यांना ह्या योजनेचा लाभ देण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक एस.आर. पाटील, प्रशासन अधिकारी वाल्मीकराव पाटील,लेखापाल श्याम सोनवणे,ग.स.स्टाफ् सोसायटीचे संचालक जगन्नाथ बाविस्कर, शाखाधिकारी आनंदराव बोरसे,उपशाखाधिकारी माधवराव सोनवणे,चंद्रकांत सोनवणे,दिलीप पाटील,लिपीक अनिल बाविस्कर,तुषार सुर्यवंशी,उज्वल शिंदे,प्राथ.शिक्षक सुरेश मोरे यांची उपस्थित होती.