*सिकलसेल आजार नियंत्रण* *तपासणी शिबीर सप्ताहाचा प्रथम चोपड्यापासून शुभारंभ..सिकलसेल आजार असलेल्या जोडप्याचा विवाह होऊ नये हि जनजागृती आवश्यक..*

 




*सिकलसेल आजार नियंत्रण* *तपासणी शिबीर सप्ताहाचा प्रथम चोपड्यापासून शुभारंभ..सिकलसेल आजार असलेल्या जोडप्याचा विवाह होऊ नये हि जनजागृती आवश्यक..*



चोपडा दि.१६ (प्रतिनिधी) :
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत, सिकलसेल
आजार नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत, सिकलसेल आजार
नियंत्रण तपासणी शिबीर चोपडा येथील उपजिल्हा
रुग्णालयात घेण्यात आले.सिकलसेल आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतू आजाराच्या लक्षणानुसार डॉक्टर उपचार करतात. सदर आजराविषयी जनजागृती व्हावी यासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र डे केअर कक्ष स्थापन करण्यात आले. सदर डे केअर कक्षाचे उद्घाटन चोपडा मतदार संघाच्या आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर सिकलसेल डे केअर कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे, जळगाव जि पचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण, तहसीलदार अनिल गावित, डॉ. मनोज पाटील, डॉ. प्रदीप लासुरकर, डॉ. पवन पाटील, डॉ गुरूप्रसाद वाघ, शिवसेना तालुका प्रमूख राजेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती कल्पनाताई पाटील, ए बी.डी.ओ. निशा जाधव, माजी उपसभापती एम व्हीं. पाटील यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण सदर आजाराविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सिकलसेल आजाराविषयी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सदर सप्ताहाची सुरूवात आज चोपडा पासून करण्यात आली आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यात तपासणी, उपचार इत्यादी सुविधा आहेत. सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. त्यासाठी विवाहपूर्व काळजी घेणे गरजेचे असल्याने, सिकलसेल असणाऱ्या जोडीचे विवाह न होऊ देणे गरजचे आहे. या आजारातील तांबड्या पेशी ऑक्सीजन अभावी वाढतात. त्यामूळे ऑक्सीजन पुरवठा क्षमता कमी होऊन जाते. त्याचा परिणाम मेंदु, किडनी इत्यादी अवयवांवर होतो. त्यामूळे हाता पायांना सूज येणे, चालतांना त्रास होणे, अंगदुखी, दम लागणे इत्यादि लक्षणे दिसून येतात. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सिकलसेलचे स्वतंत्र डे केअर कक्ष व समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे आणि ते यापुढे कायम राहील असे त्यांनी सांगितले......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने